Annapurna Drip Mix

Annapurna Drip Mix

अन्नपूर्णा

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे :

• अन्नपूर्णा हे पिकांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणारे खत आहे.

• यामधील सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना त्वरित व पूर्णपणे उपलब्ध होतात. हे खत ठिबक सिंचनाद्वारे वापरण्यास योग्य आहे.

• पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जलद गतीने भरून काढण्यास मदत करते. तसेच मुख्य, दुय्यम व इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते.

• यामधील अन्नद्रव्ये अत्यंत संतुलित प्रमाणात असून, महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड क्रमांक १ नुसार तयार केलेले आहे.

• फुलांची व फळांची संख्या वाढवण्यास तसेच त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास मदत करते.

• पिकांची वाढ जोमदार, निरोगी व संतुलित ठेवण्यास उपयुक्त आहे.

• परिणामी भरघोस व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

वापरण्याचे प्रमाण :
२ किलो प्रति एकर (फक्त ठिबकद्वारे).

वापरण्याची वेळ :
पिकांच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्थेत व फळधारणेच्या वेळी २ ते ३ वेळा वापर करावा. फळबागांमध्ये ३ ते ४ वेळा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतात.

पॅकिंग उपलब्ध : २ किलो, ५ किलो.

⸻

CHELMIL COMBI (चिलमिल कॉम्बी)

संतुलित व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे :

• चिलमिल कॉम्बी हे अत्यंत क्रियाशील व जलद परिणाम देणारे उत्पादन आहे.

• पिकांची निरोगी, जोमदार व संतुलित वाढ होण्यासाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात व चिलेटेड स्वरूपात पुरवते.

• सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता त्वरित भरून काढण्यास मदत करते.

• पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असल्यामुळे फवारणीद्वारे वापरण्यास अत्यंत उपयुक्त आहे.

• याच्या वापरामुळे पिके लवकर हिरवीगार होतात व अन्ननिर्मिती प्रक्रियेत लक्षणीय वाढ होते.

• पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून पिकांना जोमदार व सशक्त बनवण्यास मदत करते.

• उत्तम प्रतीची फुले व फळे येण्यास मदत करते.

• फळांचा स्वाद, चव, आकारमान व वजन सुधारण्यास उपयुक्त आहे.

• फळांची गुणवत्ता सुधारून निर्यातक्षम दर्जाची फळे मिळवण्यास मदत करते.

• परिणामी पिकांपासून दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादन मिळते.

वापरण्याचे प्रमाण :
१ ते १.२५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.

वापरण्याची वेळ :
पिकांच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्थेत व फळधारणेनंतर २ ते ३ वेळा फवारणी करावी.

पॅकिंग उपलब्ध : 2KG, 5KG